​ मुरूम ( प्रतिनिधी)- उमरगा तालुक्यातील अंबरनगरचे दोन वेळा बिनविरोध सरपंच तथा  धाराशिव जिल्हा मजूर सहकारी फेडरेशनचे उपाध्यक्ष किसन जाधव यांना नुकताच पुणे येथे महात्मा गांधी एक्सलन्स सर्व्हिस राष्ट्रीय अवॉर्ड २०२६ प्रदान करण्यात आला आहे. ​जिवॉन फाउंडेशन ही नीती आयोग आणि एमएसएमईकडे नोंदणीकृत संस्था असून या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आकाश कुमार साहू, व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सिंग यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. आ. बसवराज पाटील यांचे निकटवर्ती असलेले किसन जाधव यांनी गावात सिमेंट रस्ते, गटारे आणि कायमस्वरूपी पाणीपुरवठा यासारखी विकासाची कामे केली. गोरगरिबांपर्यंत शासकीय योजना पोहोचवण्यासाठी ते मंत्रालयापर्यंत सातत्याने पाठपुरावा करतात. सामाजिक सेवा, समुदाय कल्याणाच्या क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल, समाजउन्नतीसाठी आपली सेवा, जिद्द, वचनबद्धता खरोखरच प्रेरणादायी आहे.  बसवराज पाटील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून १५२९ लोकसंख्येच्या अंबरनगरमध्ये तब्बल ८ कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण करून जिल्ह्यात एक विक्रमच केला. या अगोदर त्यांना ​महाबळेश्वर येथे आदर्श सरपंच ग्रामरत्न राज्यस्तरीय पुरस्कार, ​जून महिन्यात अटल बिहारी वाजपेयी सेवारत्न सन्मान प्राप्त झाला. जाधव यांच्या सामाजिक आणि विकास कामामुळे त्यांना मिळालेल्या सन्मानाबद्दल  अंबरनगरसह धाराशिव जिल्ह्यातून विविध स्तरातून त्यांच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top