धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अलीकडेच केलेली एस.टी. बस प्रवास अतिरिक्त 13.5% भाडेवाढ तात्काळ रद्द करावी, या मागणीसाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना विभाग नियंत्रक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या मार्फत धाराशिव यांच्या यांच्या वतीने  देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, एस.टी. बस ही ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांच्यासाठी जीवनवाहिनी असून, वाढत्या महागाईच्या काळात प्रवास भाड्यात करण्यात आलेली वाढ ही सर्वसामान्यांवर अन्याय करणारी आहे. इंधन, अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे दर आधीच वाढलेले असताना एस.टी. भाडेवाढीमुळे नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यावेळी एस.टी. प्रवास भाडेवाढ तात्काळ रद्द करणे, विद्यार्थी, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग यांना अधिक सवलती देणे, ग्रामीण भागातील एस.टी. सेवा अधिक नियमित, सुरक्षित व दर्जेदार करणे तसेच भविष्यात कोणतीही भाडेवाढ करण्यापूर्वी जनतेच्या हिताचा विचार करून संबंधित घटकांशी चर्चा करणे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

या मागण्यांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर, प्रशांत पाटील,जावेद काझी,अभिषेक बागल,संकेत पडवळ, मोइब पठाण व इतर पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top