धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र विधानपरिषदेचे मा. उपसभापती मा. श्री. सचिन अहिर यांनी सहकुटुंब श्रीक्षेत्र तुळजापूर येथे येऊन श्री तुळजाभवानी मातेचे विधिवत दर्शन घेतले. यावेळी त्यांनी श्री तुळजाभवानी देवीची आरती करून देवीचे आशीर्वाद घेतले तसेच राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धी, शांतता व सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना केली.
यावेळी मा. उपविभागीय अधिकारी, धाराशिव तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे विश्वस्त ओंकार देशमुख तसेच तुळजापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे विश्वस्त विनोद गंगणे यांनी सचिन अहिर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच श्रीदेवीजींची प्रतिमा, महावस्त्र देऊन यथोचित सत्कार केला. दर्शनानंतर सचिन अहिर यांना श्री तुळजाभवानी मंदिरातील भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या विविध सुविधा तसेच मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकासकामांची माहिती देण्यात आली. यावेळी पुजारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
