धाराशिव (प्रतिनिधी)- आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समिती, जिल्हा धाराशिव यांच्या वतीने आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्या मार्फत संयुक्त निवेदन सादर करण्यात आले.

या निवेदनाद्वारे नवी दिल्ली येथील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या सोनम वांगचूक व अभिजीत दीपके यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आला. लोकशाही, संविधान आणि जनहिताच्या प्रश्नांवर सुरू असलेल्या या आंदोलनातील मागण्यांवर केंद्र सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.

तसेच, नाशिकला जात असताना ठाणे येथे भीमसैनिक राजू थाटे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. या प्रकरणातील सर्व मुख्य आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, खटला जलदगती न्यायालयात चालवावा तसेच पीडित राजू थाटे व त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक संरक्षण व न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

यावेळी सादर करण्यात आलेल्या निवेदनावर राजाभाऊ राऊत, विकास बनसोडे, सिद्धार्थ ओव्हाळ, भालचंद्र कटारे, बाळासाहेब माने, अनिल हजारे, सुनील वाघमारे, उमाजी गायकवाड, संपत सरवदे, प्रा. महादेव वाघमारे, सुशील गायकवाड, अंगुल माने, अंकुश हुंबे, राजाभाऊ गायकवाड आणि मुकेश गायकवाड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


 
Top