धाराशिव (प्रतिनिधी)- उपन्यासकार मुंशी प्रेमचंद यांनी देशातील सामाजिक विषमता समाजासमोर मांडली आहे असे प्रतिपादन डॉ.विनोदकुमार वायचळ यांनी केले. येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिवच्या हिंदी विभागांतर्गत भारतातील थोर साहित्यिक मुंशी प्रेमचंद यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली,
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.के मंजुळकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. व्यंकटेश महाजन महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख डॉ.विनोदकुमार वायचळ म्हणाले की, माणूस समाजाप्रती संवेदनशील असला की सामाजिक आस्था निर्माण होत असते. तर अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ मंजुळकर यांनी म्हणाले की, सामाजिक इतिहास हा साहित्याच्या माध्यमातून आपणास समजत असतो. पूर्वी सरंजामशाही अस्तित्वात होती. सावकार शेतकरी वर्गाचे शोषण करत असत, दलितांवर, स्त्रीयांवर अन्याय होत असत. समाजात उग्र विषमता अस्तित्वात होती. या विषमतेवर मात करण्यासाठी प्रेमचंद यांनी साहित्य लिखाण केले.
सदर प्रसंगी हिंदी विभाग प्रमुख डॉ केशव क्षीरसागर,प्रा माधव उगिले,प्रा राजा जगताप, डॉ मारुती लोंढे, डॉ बालाजी गुंड, डॉ अरविंद हंगरगेकर यांच्यासह सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा राणुबाई कोरे यांनी केले. तर आभार डॉ. शितल गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा विवेकानंद चव्हाण यांनी पुढाकार घेतला.
