तुळजापूर (प्रतिनिधी)- मध्य रेल्वे प्रशासनाने धाराशिव जिल्हा व अधीनस्थ न्यायालयांमध्ये रेल्वेशी संबंधित खटले व न्यायालयीन कामकाज हाताळण्यासाठी 10 वकिलांची पॅनेलवर नियुक्ती केली आहे. यात तुळजापूर येथील एडवोकेट जनक कदम पाटील यांची या पॅनलमध्ये निवड केली आहे. ही नियुक्ती तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढील आदेशापर्यंत लागू राहणार असल्याचे मध्य रेल्वेच्या विधी विभागाने स्पष्ट केले आहे.
रेल्वे बोर्डाच्या नियमानुसार या वकिलांकडे धाराशिव जिल्हा व अधीनस्थ न्यायालयांतील रेल्वेच्या न्यायालयीन प्रकरणांची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. या नियुक्तीमुळे धाराशिव जिल्ह्यातील रेल्वेच्या प्रलंबित तसेच नव्या न्यायालयीन प्रकरणांचा पाठपुरावा अधिक प्रभावीपणे होण्यास मदत होणार आहे.
