उमरगा (प्रतिनिधी)- श्रमजीवी अध्यापक महाविद्यालय उमरगा येथे गुरुपौर्णिमा निमित्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय सरपे यांच्या हस्ते सावित्रीमाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी प्रा. भुजबळ दत्तात्रय, प्रा. चव्हाण देविदास,प्रा. पवार भाऊ, प्रा. तेजस्विनी करंडे, प्रा. इंगळे अमोल, आदित्य सूर्यवंशी,सुरवसे दगडू व प्रशिक्षण्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
