भूम (प्रतिनिधी)- पाथरूड तालुका भूम येथील कुमारी स्नेहा दुधाळ हिला ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी. फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य निर्मित साई प्रेरणा पुरस्कार 2026 चा आंतरराष्ट्रीय नृत्य सम्राज्ञी पुरस्कार सिने अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते मिळाल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
तीर्थक्षेत्र शिर्डी येथे शहरी बरोबरच ग्रामीण भागातील कलाकारांच्या कलेला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी, कलेच कौतुक करण्यासाठी ओम साई विकास प्रतिष्ठान बी.बी.सी. फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य निर्मित साई प्रेरणा गौरव पुरस्कार 2026 साठी विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींची या पुरस्कारासाठी निवड केली. यामध्ये ग्रामीण व दुर्गम भागातील पाथरूड तालुका भूम येथील महाविद्यालयीन शिक्षण घेणारी स्नेहा दुधाळ हिची आंतरराष्ट्रीय नृत्य सम्राज्ञी म्हणून पुरस्कारासाठी निवड केली. हा पुरस्कार माहेरची साडी फेम प्रसिद्ध सिने अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते अनेक ज्येष्ठ साहित्यिक, कलावंत, विचारवंतांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्नेहा दुधाळ हिचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे आठवडे बाजार सारख्या छोट्या गावातील रहिवासी असलेल्या कलाकाराला आर्थिक परिस्थितीमुळे कसल्याही प्रकारचे प्रशिक्षण मिळाले नाही.
