कळंब (प्रतिनिधी)- भाटशिरपुरा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी दररोज सायंकाळी 7 ते 9 या वेळेत स्वतःच्या घरातील टी.व्ही. बंद ठेवण्याची व मोबाईल पासून दूर राहण्याची प्रतिज्ञा घेतली आहे.
टी.व्ही. व मोबाईल मुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे तसेच डोळ्यावर पण त्याचा प्रतिकूल परिणाम होत आहे. टीव्ही व मोबाईल मध्ये विद्यार्थ्यांचा वेळ वाया जात असल्यामुळे तो वेळ वाचवण्यासाठी व स्क्रीन पासून विद्यार्थ्यांना काही वेळ दोन दूर ठेवण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाटशिरपूरा शाळेतील विद्यार्थ्यांनी दररोज सायंकाळी 7 ते 9 या वेळेत स्वतःच्या घरातील टी.व्ही. बंद करून मोबाईल पासून दूर राहून दररोज सायंकाळी दोन तास अभ्यास करण्याची प्रतिज्ञा घेतले आहे.
मुख्याध्यापक बाळकृष्ण तांबारे यांच्या संकल्पनेतून तसेच शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष सुशील गायकवाड उपाध्यक्ष तैमुरलंग शेख व शाळेतील शिक्षक श्रीकांत तांबारे,नागेंद्र होसाळे, सचिन तामाने , अमोल बाभळे, राजाभाऊ शिंदे, लिंबराज सुरवसे, राजकन्या तोडकर, कालींदा मुंडे या सर्व शिक्षकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास करण्याची सवय लागावी यासाठी हा उपक्रम घेण्यात आल्या आहे या उपक्रमाचे सर्व पालकांनी स्वागत केले.
आमच्या भाटशिरपुरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बाळकृष्ण तांबारे यांच्या संकल्पनेतून सायंकाळी 7 ते 9 या कालावधीत गावातील सर्व टीव्ही व मोबाईल बंद ठेवून विद्यार्थ्यांनी सलग दोन तास नियमित अभ्यास करावा यासाठी राबवलेला जो उपक्रम आहे हा स्तुत्य उपक्रम आहे उपक्रमातून यामुळे विद्यार्थी दररोज सायंकाळी दोन तास अभ्यासाला बसत आहेत यामुळे त्यांना अभ्यासाची आवड निर्माण होण्यासाठी उपयोग होणार आहे.
अतुल गायकवाड
पालक भाटशिरपूरा
दररोज सायंकाळी 7 ते 9 या वेळेत घरातील टीव्ही व मोबाईल बंद ठेवण्याचे आवाहन शाळेच्या मुख्याध्यापकांनी केलेले आहे या आवाहनास पालकातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. याचा परिणाम विद्यार्थी घरी सायंकाळी दोन तास चांगला अभ्यास करत आहेत.याचा सकारात्मक परिणाम त्यांच्या गुणवत्तेवर दिसून येत आहे.
सुशील गायकवाड
अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती भाटशिरपुरा
विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासाची सवय लागावी यासाठी आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाटशिरपूरा शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती व सर्व शिक्षकांनी मिळून हा उपक्रम गावांमध्ये राबवण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार सर्व विद्यार्थ्यांनी सायंकाळी दोन तास मोबाईल व टीव्ही बंद ठेवून अभ्यास करण्याची प्रतिज्ञा केलेली आहे. सायंकाळी काही पालकांना फोन करून आपल्या घरातील टीव्ही बंद आहे का याची आम्ही खात्री करत आहोत
बाळकृष्ण तांबारे
मुख्याध्यापक
