उमरगा (प्रतिनिधी)- महावितरणच्या बेजबाबदार कारभाराविरोधात, शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या प्रश्नावर, नीट व टीईटी पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी तसेच पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ काँग्रेसच्या वतीने सोमवारी उमरग्यात भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. युवा नेते आश्लेष मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा परिषद सदस्या लता मोरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाला संभाजी ब्रिगेडनेही जाहीर पाठींबा दिला.
यावेळी आंदोलनात रेखा सूर्यवंशी, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष दिलीप पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ॲड. दिलीप सगर यांनी सरकारवर टिका केली. आंदोलकांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या लता मोरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अर्जुन बिराजदार, नानाराव भोसले, उपनगराध्यक्ष विजय वाघमारे, नगरसेवक अभिजीत मोरे, विजय दळगडे, विशाल काणेकर, बाबा औटी, बाबा मस्के, इरफान शेख, संजय जाधव, एम. ओ. पाटील, दिलीप पवार, अभिषेक औरादे, आदर्श कोथिंबिरे, संजय सरवदे, मधुकर यादव, मधुकर बिद्री, राहुल वाघ, सतीश मुदकण्णा, कमलाकर मामले, वैशाली जाधव, दत्ता इंगळे, लक्ष्मण काजळे, प्रफुल्ल गायकवाड, अभिमन्यू भोसले, दादा साळुंके यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
