धाराशिव (प्रतिनिधी)- वसंतराव नाईक यांनी आपल्या प्रदीर्घ मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात शेती, जलसंधारण, ग्रामीण विकास, शिक्षण आणि रोजगारनिर्मिती यांसारख्या क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा मिळाली. शेतकरी आणि ग्रामीण भागाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांनी राबविलेली धोरणे आजही प्रेरणादायी आहेत. असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. अंबादास मंजुळकर यांनी केले.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरितक्रांतीचे शिल्पकार आणि दूरदृष्टीचे नेतृत्व लाभलेले स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. उपस्थितांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.बालाजी गुंड यांनी केले. तर आभार सचिन चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा.विवेकानंद चव्हाण कार्यालयीन प्रबंधक सुमेर कांबळे, प्रसिद्धी प्रमुख डॉ. मारुती अभिमान लोंढे आदिसह सर्व गुरुदेव कार्यकर्ते उपस्थित होते.
