धाराशिव (प्रतिनिधी)- लाठ्यांनी विद्यार्थ्यांना मारले तरी त्यांचे विचार विचार मारता येत नाही. अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण निटुरे यांनी दिली आहे. 

लोकशाहीत आवाज दाबला जात नाही ऐकला जातो. लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारमय करणाऱ्या नीट परीक्षेचे पेपर वारंवार लीक होतात तरी सरकार गप्प का ? विद्यार्थी फक्त शिक्षणमंत्री ना. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागत आहेत.  संविधानिक आंदोलनातून जंतर-मंतर नवी दिल्ली उपोषण करून आपल्या न्याय्यीक मागण्या मागत आहेत, तरी सरकार गप्प?  उलट आंदोलन कर्त्यावरच मुडदे पाडणारा गुराढोरांना मारावा आसा लेकीबाळीवरही  बेछूट लाठीचार्ज.?

मायबाप सरकार अगप्प बसून प्रश्न सुटत नसतात.संवाद साधायला हवा. शेवटी शेतकऱ्यांची, गरिबांची लेकरं आहेत. विद्यार्थ्यांना लाठ्यांनी मारणं सोपे आहे.पण विचार मारता येतील का? लोकशाहीत आवाज दाबला जावू नये. ऐकला जावा. देशभरातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय अर्थात जागतिक पातळीवर आपल्या देशाची प्रतिमा मलिन होत आहे.  आम्ही भारताचे लोक सर्वामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता एकात्मता प्रवर्तित करण्याचा संकल्पपूर्वक विचार करून. मायबाप सरकार नीट पेपर लीक करणाऱ्यावर कारवाई करा, प्रश्न विचारणाऱ्यावर नाही.संविधानाने दिलेले अधिकार लोकशाहीतील मायबाप सरकारने नाकारू नयेत. 

 
Top