परंडा (प्रतिनिधी)-  परंडा येथे श्री संत ज्ञानेश्वर  महाराज जन्मभूमि श्रीक्षेत्र आपेगाव या आषाढी वारी पालखी सोहळाचे उत्साहात स्वागत करत हिन्दू- मुस्लीम ऐक्याचे प्रतिक मंडई पेठ येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील, जनशक्ती नगर विकास आघाडीचे नेते विश्वजित ज्ञानेश्वर पाटील,उपनगरध्यक्ष समरजित सुजितसिंह ठाकुर, जेष्ठ नेते शब्बीर पठाण, जेष्ठ नेते जनार्धन मेहेर यांनी स्वागत केले. 

यावेळी शिवसेना शहरप्रमुख रईस मुजावर, न.प.गटनेते अनिल शिंदे, पाणीपुरवठा समिती सभापती रमेशसिंह परदेशी,सार्वजनिक बांधकाम  समिती सभापती राहुल बनसोडे, नगरसेवक इस्माईल कुरेशी, नगरसेवक डॉ.अब्बास मुजावर, नगरसेवक मजहर दहेलूज, नगरसेवक सत्तार पठाण, नगरसेवक आकिब भाई पठाण, नगरसेवक सोमनाथ अलबत्ते, मधुकर गायकवाड, संतोष मेहेर, लतीफ कुरेशी आदी उपस्थित होते.


 
Top