तुळजापूर (प्रतिनिधी)-  महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी आज महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेऊन विधिवत पूजा-अर्चा केली.

यावेळी राज्यपालांनी श्री तुळजाभवानी देवींची ओटी भरून आरती केली तसेच परंपरेनुसार कुलधर्म व कुलाचार केले. राज्यपालांचे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान येथे आगमन झाल्यानंतर जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार तसेच अपर जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपेंद्र तामोरे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, खाजगी सचिव पवन सिंग, पोलीस अधीक्षक रितू खोकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने तसेच श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 
Top