तुळजापूर (प्रतिनिधी)- सिने अभिनेते बॉलिवूड सुपरस्टार माजी खासदार गोविंदा यांचा तुळजापूर पंचायत समितीचे माजी सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण यांनी भव्य सत्कार केला.

विजापूर येथील जुगनू महाराज यांच्या दुर्गामाता महोत्सवासाठी अभिनेता गोविंदा आला होता. यावेळी कर्नाटक महाराष्ट्र, आंध्रप्रदेश येथील बंजारा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यांना भावनिक साद घालत जीवनात काम करत असताना आपल्यावर व आपल्या समाजावर कुठलिही बाधा येऊ नये अशी देवीकडे प्रार्थना करु असे म्हणत सर्वांना शुभेच्छा दिल्या.

व्यासपीठावर महाराष्ट्र राज्याचे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, तेलंगणा राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष डॉ रामचंद्र नायक, माजी खासदार उमेश जाधव, उद्योजक शंकर पवार, किसन भाऊ राठोड,आमदार किरण सावंत, माजी आमदार नरसिंग मेगंजी, संदीप राठोड सोलापूर,लाला राठोड अक्कलकोट ,सुर्यकांत चव्हाण तुळजापूर, यांच्या सह महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, या राज्यातून , महाराज, पुजारी बंजारा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top