भूम,(प्रतिनिधी)- देवशयनी आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त भूम शहरातील साळीवाडा येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शनिवारी, 25 जुलै 2026 रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

कार्यक्रमाची सुरुवात पहाटे 5.25 वाजता काकडा आरतीने होणार आहे. त्यानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी यांचा अभिषेक, सकाळी 6.15 वाजल्यापासून भाविकांसाठी दर्शन सुरू होईल. सकाळी 9.30 वाजता प्रमुख पाहुणे व पत्रकार बांधवांच्या हस्ते आरती करण्यात येणार असून, त्यानंतर फराळ प्रसादाचे वाटप होईल.

दुपारी 1 ते 5 या वेळेत भूम शहरातील महिलांचे भजन आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी 5.30 वाजता हरिपाठाने दिवसाच्या धार्मिक कार्यक्रमांची सांगता होणार आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने दिवसभर भाविकांसाठी फराळ प्रसादाचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. तसेच आनंद सोहळा आणि फराळ प्रसादासाठी इच्छुकांनी स्वेच्छेने देणगी देऊन सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. ज्यांना अभिषेक करावयाचा आहे त्यांनी राम नाथराव बाबर (मो. 9021502905) यांच्याशी संपर्क साधावा. या धार्मिक सोहळ्यास भूम शहर पत्रकार संघाचे विशेष सहकार्य लाभले असून, विठ्ठल भक्तांनी या पवित्र सोहळ्यात सहभागी होऊन विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्याचे आवाहन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, साळीवाडा, भूम यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 
Top