धाराशिव (प्रतिनिधी)-  केंद्रीय सहकार मंत्रालय व सहकार विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय सहकार सप्ताह2026 निमित्त महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित, पुणे, जिल्हा उपनिबंधक कार्यालय, धाराशिव, जिल्हा सहकार बोर्ड मर्यादित, धाराशिव तसेच रूपामाता अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने रूपामाता ईरा इंटरनॅशनल स्कूल, सांजा रोड, धाराशिव येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी जिल्हा उपनिबंधक पांडुरंग साठे, रूपामाता परिवाराचे संस्थापक ॲड. व्यंकट गुंड, सहाय्यक निबंधक अरुण शेंदारकर, सहाय्यक निबंधक ए. आर. सय्यद, कार्यालय अधीक्षक डी. एस. जाधव, जिल्हा सहकार विकास अधिकारी मधुकर जाधव, रूपामाता मल्टीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद खांडेकर, रूपामाता अर्बनचे मुख्य प्रशासकीय अधिकारी विशाल गुंड पाटील, रूपामाता ईरा इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य सर्वपल्ली अरुण कुमार, रुपामाता प्राथमिक चे मुख्याध्यापक विजय पिंपळकर, हेड मँनेजर अजयसिंह ठाकूर तसेच रूपामाता फाऊंडेशनचे समन्वयक गजानन पाटील, यांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

यावेळी मान्यवरांनी पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपणाबरोबरच वृक्षांचे संगोपन करण्याचीही गरज अधोरेखित केली. सहकार चळवळीच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरण संवर्धनासाठी अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. या कार्यक्रमास सहकार विभागातील अधिकारी व कर्मचारी, रूपामाता परिवाराचे पदाधिकारी, शाळेचे शिक्षक, विद्यार्थी तसेच नागरिकांची उपस्थिती होती.


 
Top