भूम (प्रतिनिधी)-   भूम येथे अविनाश नगर  वासियांच्या व शंभूराजे बचत गटाच्यावतीने नीट 2026 परीक्षेत यशस्वी झालेल्या सिद्धी नारायण सपकाळ (574) गुण व अश्विनी रणजित खामकर (462) गुण या दोन विद्यार्थीनींचा सत्कार करण्यात आला. त्याच बरोबर टीईटी परीक्षा उत्तीर्ण होऊन मुख्याध्यापक पदावर पदोन्नती झालेल्या तीन शिक्षकांचा सत्कार भूम नगरपरीषदेचे माजी नगराध्यक्ष तथा गटनेते संजय गाढवे, नगरसेवक सूरज गाढवे, गायकवाड, थोरात यांच्या हस्ते करण्यात आला.

सत्कार मूर्ती मध्ये नारायण सपकाळ (मुख्याध्यापक, केंद्रीय प्राथमिक शाळा पारगाव ता.वाशी), राजेंद्र गाडे (मुख्याध्यापक, केंद्रीय प्राथमिक शाळा,आष्टा), अच्युत मुळे ( मुख्याध्यापक जि.प.प्रा.शा.चुंबळी)  या तिघांचा पदोन्नती मिळाल्याबद्दल अविनाश नगर, शंभूराजे बचत गट यांच्या वतीने तसेच संजय गाढवे व सूरज गाढवे यांच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाला अविनाश नगर येथील रहिवासी शिक्षक वृंद, वकील मंडळी,बचत गट सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन बचत गटाचे अध्यक्ष संदीप मोटे यांनी केले. सूत्रसंचालन सचिव संभाजी भोसले यांनी केले. तर आभार प्रदर्शन रामदास गायकवाड यांनी मानले. 


 
Top