भूम (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी मराठवाडा संयोजक नितीन काळे यांच्या मातोश्री प्रतिभा रामराव काळे यांना कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते प्रतिष्ठेचा ‘जिजामाता कृषी भूषण पुरस्कार' प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
या उल्लेखनीय यशाबद्दल सौ. प्रतिभा रामराव काळे यांचा सत्कार करून मनःपूर्वक अभिनंदन तसेच पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. कृषी क्षेत्रातील त्यांचे योगदान अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांना निरोगी, दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या कार्यातून शेतकरी समाजाला अशीच प्रेरणा मिळत राहो, ही सदिच्छा. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष श्री. महादेव वडेकर, तालुकाध्यक्ष श्री. संतोष सुपेकर, शहराध्यक्ष श्री.बाबासाहेब वीर, परंडा सरचिटणीस श्री.धनाजी गायकवाड, सिद्धार्थ जाधव आदी उपस्थित होते.
