तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेस तपासणी करिता विभागीय परीक्षा मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष सुधाकर तेलंग  आणि शिक्षणाधिकारी योजना धाराशिव  नागेश मापारी  यांनी भेट देऊन पीएमश्री योजनेच्या निकषां नुसार केलेल्या  विविध उपक्रमांच्या अंमलबजावणीची तपासणी करून समाधान व्यक्त केले. 

शाळेतील भौतिक सुविधा, विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि शाळेतील विविध उपक्रमांचा आढावा घेत सन्माननीय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक करत राहिलेल्या उणिवा दूर करून  सर्व उपक्रम व्यवस्थित रित्या राबवण्याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधत स्वतःच्या व्यक्तीमत्वाध्ये कोणकोणत्या बाबी रुजवल्या पाहिजेत जेणेकरून आपल्या व्यक्तिमत्त्वाचा समाजासाठी व स्वतःसाठी उपयोग करून घेता येईल याबाबत मार्गदर्शन केले. तसेच सर्व शिक्षकांना मार्गदर्शन करत आपली शाळा एक आदर्श शाळा कशाप्रकारे बनवता येईल आणि त्यासाठी सर्व शिक्षकांनी एकत्र येऊन टीमवर्क नुसार काम करण्याची आवश्यकता असल्याचे सन्माननीय अधिकाऱ्यांनी सांगितले. पुढील काळात राहिलेल्या सर्व उणीवा दूर करून एक आदर्श शाळा निर्माण करण्यासाठी तसेच शाळेचा पट वाढवून समाजामध्ये आदर्श निर्माण करण्यासाठी सन्माननीय अधिकाऱ्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी मुख्याध्यापक तय्यबअली शहा उपस्थित होते.

 
Top