मुरुम (प्रतिनिधी)-  दि .16 जूलै 2026 रोजी श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथील एनसीसी विभागाच्या वतीने जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्यात आला.हे कार्यक्रम महासंचालक एनसीसी कार्यालय दिल्ली यांच्या वतीने समाजसेवा आणि सामुदायिक विकास विभाग यांच्या वतीने युवक जनजागृती विषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानासाठी इतिहास विभाग प्रमुख डॉ गिरीधर सोमवंशी यांनी मार्गदर्शन केले. प्राचीन कौशल्या सोबत आधुनिक युगातील कौशल्य यांच्या माध्यमातुन भारतीय युवकांची क्षमता,नविनकल्पना आणि आत्मविश्वासाला योग्य दिशा देणे गरजेचे आहे.आजचे युग हे केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित राहिलेले नाही.आजच्या वेगाने बदलणाऱ्या जगात, संगणक,तंत्रज्ञान , डिजीटल आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या युगात केवळ पदवी असणे पुरेसे नाही त्या शिक्षणासोबतच स्वतःच्या कौशल्यांमध्ये सातत्याने बदल करणे ही काळाची गरज बनली आहे.भारतासारख्या सर्वात जास्त तरुण लोकसंख्या असणाऱ्या देशात सर्वांना सरकारी नौकरी मिळणे शक्य नाही यासाठी कौशल्यपुरक युवा कौशल्यांचे शिक्षण घेणे गरजेचे आहे .आज स्किल इंडिया,डिजिटल इंडिया विविध केंद्र व राज्य शासनाच्या उपक्रमांद्वारे आपल्या देशातील तरुणांना विविध प्रकारच्या व्यवसायांचे आणि तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाते .या संकल्पनेतून तरुणांना केवळ तांत्रिक शिक्षणच नव्हे, तर डिजिटल कौशल्ये आणि कल्पकता आत्मसात करण्याचा संदेश दिला जातो .हे ध्येय गाठण्यासाठी कौशल्य हेच आपले सर्वात मोठे शस्त्र आहे.शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान ,कला, हस्तकला,डिजिटल मार्केटिंग किंवा इलेक्ट्रीकल, मोठ्या कंपनी,उद्योग, व्यवसाय, शासकिय, खाजगी कार्यालय  सर्वच क्षेत्रात आपण निपुण बनले पाहिजे. शिक्षा केवळ पदवी मिळवण्यापुरते मर्यादित न राहता,नवनवीन कौशल्य, आत्मनिर्भर होणे अगत्याचे आहे. यासाठी तरुणांनी डिजीटल कौशल्य शिक्षण घ्यावे असे आव्हान सोमवंशी यांनी केले .या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य संजय अस्वले यांनी भूषविले प्रास्ताविक कॅप्टन डॉ ज्ञानेश्वर चिट्टमपल्ले, आभार अर्जुन पाचंगे यानी केले .तसेच कार्यक्रमासाठी डॉ पदमाकर पिटले,डॉ विनोद देवरकर प्रा घंटे, प्रा म्हेत्रे व कॅडेटस,विद्यार्थी,प्राध्यापक, प्राध्यापिका उपस्थित होते .

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top