तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे पाचव्या पिढीपासून चालत आलेल्या आचार्य कुटुंबातील श्रीमद्भ भागवत सप्ताहाची सांगता झाली. 

गुरुपर्णिमेनिमित्त पुरातन त्रिविक्रम मंदिरात पूर्वापार चालत आलेला काल्याचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी श्रीराम महाराज रामदासी( तेर) यांचे कीर्तन झाले. यावेळी मोठ्या संख्येने भाविकभक्त उपस्थित होते. काल्याच्या कार्यक्रमानंतर त्रिविक्रम मंदिरातून दिंडी मुख्य रस्त्यावरून नरसिंह वेस येथील हनुमान मंदिराजवळ आल्यावर तेरणा नदीला आरती करून हनुमान मंदिरात जाऊन प्रसादाचा अभंग घेऊन दिंडी तेर येथील पाचव्या पिढीपासून चालत आलेल्या आचार्य कुटुंबातील श्रीमद्‌‍ भागवत ग्रंथास आरती करून दिंडी त्रिविक्रम मंदिरात आल्यानंतर वारकऱ्यांनी विविध खेळ खेळून, महिलांनी फुगड्या खेळून दिंडी त्रिविक्रम मंदिरास प्रदक्षिणा घालून महाप्रसादाचा अभंग म्हणल्यावर प्रसादाचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.

 
Top