उमरगा (प्रतिनिधी)-  उमरगा तालुक्यातील कराळी - तुरोरी परिसरातील श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी गुरूपौर्णिमा उत्सव बुधवार दि. 29 जुलै रोजी सायंकाळी 5 :30 वाजता घोड्यांचे गोल रिंगण सोहळा हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून औराद शहा. ता. निलंगा येथून सोमवार दि. 27 जुलै रोजी सकाळी सदगुरु उज्वलानंद महाराज यांच्या पादुका, रथ, नगारा, टाळकरी, वारकरी, पताकाधारी, विनेकरी, रथातून पालखीत पादुका ठेवून निलंगा, कासारशिरसी, मुळज, तुरोरी मार्गे पायथ्याशी आल्या. तर या रिंगणाच्या ठिकाणी बुधवार दि. 29 जुलै रोजी सकाळी कर्नाटक राज्यातील बसवकल्याण तालुक्यातील एकंबा येथील पालखी सोहळा मळगी, चिंचकोक, तुरोरी मार्गे पायथ्याशी, तर नवचंदवाडी येथील पालखी सोहळा कर्नाटक बॉर्डर, तलमोड मार्गे पायथ्याशी, मळगीवाडी येथील पालखी आष्टा, तुरोरी मार्गे पायथ्याशी या चार गावात इतर गावांतील दिंडीच्या माध्यमातुन परंपरा चालवित हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत पालख्यांचे आगमण मोठ्या उत्साहात झाले. एकुण चार पालखीचे आगमण झाल्यानंतर टाळ मृदंगाच्या जयघोषात हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत घोड्यांचे गोल रिंगण संपन्न झाले. एका घोड्यावर चोपदार तर दुसऱ्या घोड्यावर सदगुरु उज्वलानंद महाराज यांच्या पादुका ठेवून रिंगण सोहळा संपन्न झाला. 

रिंगण सोहळ्याअगोदर श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान येथील सदगुरू उज्वलानंद महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या बाल वारक-यांनी उपस्थित जनसमुदायासमोर पाऊल खेळत ठेका धरून मंञमुग्ध केले. या रिंगण सोहळ्यात हभप. महेश महाराज माकणी, हभप. ज्ञानेश्वर महाराज कानेगाव, हभप. भिम महाराज अचलबेट देवस्थान, हभप. हरी गुरूजी लवटे महाराज अचलबेट देवस्थान, हभप. दिपक महाराज जाधव अमरबेट देवस्थान, हभप. सत्यवान महाराज इंगळे, हभप. भागवत पाचंगे महाराज यांच्यासह आमदार प्रवीण स्वामी, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा उषाताई गायकवाड, माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पत्नी चौगुले, पंचायत समितीच्या सभापती आकांक्षाताई चौगुले, तुरोरी जिल्हा परिषद सदस्य अर्चना जाधव, उमरगा नगर परिषदेचे नगराध्यक्ष किरण गायकवाड, पंस. माजी उपसभापती युवराज जाधव, नगरसेविका कु. शिंदे, आदी. पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर गुरूपौर्णिमा बुधवारी संध्याकाळी 7 ते 9 या वेळेत हभप. अनिल महाराज पाटील बार्शी यांचे सुंदर सुश्राव्य किर्तन सेवा संपन्न होणार होते.  श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत रिंगण सोहळा संपन्न झाला आहे. 


ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम चार जयघोष करीत वारकरी रिंगण सोहळ्यात सहभागी झाले तर पताकाधारी, विनेकरी, टाळकरी, पखवाज वादक, डोक्यावर तुळशीवृंदावन घेऊन सहभागी भक्त महिला, त्यानंतर चोपदार चार घोडा व पादुका ठेवून असलेला अश्व असा रिंगण सोहळा पार पडला.

 
Top