भूम (प्रतिनिधी)- विठ्ठल भक्ती रसात वाहून घेतलेले भक्त कशा प्रकारची कला सादर करतील, भक्ती व्यक्त करतील सांगता येत नाही, भूम येथील एका विठ्ठल भक्त महिला सौ विद्या संदीप खामकर यांनी आपल्या राहत्या घरी आकर्षक सुंदर अशी विठ्ठलाची रांगोळीतून प्रतिकृती साकारून भाविक भक्तांचे लक्ष वेधून घेतला आहे.
विठ्ठलाचे चरण स्पर्श व्हावं , गंगेत न्हावून जावं, यासाठी शेकडो कोसावरून विठ्ठल भक्त वारीमध्ये सहभागी होऊन पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होतात, पांडुरंगाचे दर्शन घेतात, आणि आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी साकड पण घालतात. आषाढी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाच्या दरबारामध्ये लाखो भाविक दर्शनासाठी दाखल होतात. ज्यांना पंढरीकडे जाणे अशक्य आहे असे भाविक भक्त विविध प्रकारच्या माध्यमातून पंढरीकडे जाणाऱ्या वारकरी बांधवांची मनोभावे सेवा करून विठ्ठल भक्ती दाखवण्याचा प्रयत्न करतात. पंढरीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर दुहेरी ठीक ठिकाणी छोटी छोटी सेवा दालन उभा केलेली दिसतात . अनेक जण आपल्या कलेच्या माध्यमातून भक्ती दाखवण्याचा ही प्रयत्न करतात.
आषाढी एकादशीच निमित्त साधून अशाच एका विठ्ठल भक्त महिला आर्टिस्ट भगिनी सौ विद्या संदीप खामकर यांनी शनिवार दिनांक 25 जुलै 2026 रोजी आपल्या राहत्या घरातील एका खोलीमध्ये 15 किलो रांगोळीचा वापर करून, वेगवेगळ्या 15 कलरचा वापर करून, 15 फूट उंच, 8 फूट रुंद आकारात तब्बल 5 तासात लक्ष वेधक अशी विठ्ठलाची प्रतिकृती साकारली आहे. अनेक विठ्ठल भक्तांनी, पांडुरंग भक्तांनी रांगोळी पाहून आर्टिस्ट महिला भगिनीचे कौतुक करत हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
