धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलचे सालाबादाप्रमाणे यावर्षी स्कॉलरशिप परीक्षेत 102 विद्यार्थी पात्र ठरले असून हे दैदिप्यमान यश प्रशालेने प्राप्त केले आहे. इयत्ता सातवी स्कॉलरशिप मध्ये 200 पेक्षा अधिक गुण घेणारे 32 विद्यार्थी आहेत. श्रीपतराव भोसले हायस्कूलची शिष्यवर्ती परीक्षेत यशाची उज्ज्वल परंपरा कायम राहिली आहे.
इयत्ता सातवीमध्ये प्रथम क्रमांकावर अन्वी राजेनिंबाळकर हिने 278 गुण घेतले. तर द्वितीय क्रमांकावर श्रेया शरद क्षीरसागर 274 गुण घेतले. तर तृतीय क्रमांकावर घोगरे कौस्तुभ राहूल 262 गुण, चौथ्या स्थानावर गरड अनन्या रोहित, भातभागे आरोही अशोक, गायकवाड अथर्व विश्वास 246 गुण घेतले. पाचव्या क्रमांकावर गोरे राजवीर व उंबरे श्रुती 240 गुण, सहाव्या क्रमांकावर गव्हाणे ईश्वरी विशाल व शेळके मधुरा महादेव व कुठार समर्थ सतीश यांना 236 गुण मिळाले. तर सातव्या स्थानावर कदम गौरवी गणेश 230 गुण, आठव्या स्थानावर पाटील अनुष्का अमित व पवार सोनाक्षी विलास यांना 228 गुण, नवव्या स्थानावर कुठार श्रद्धा महेश व सुतार स्वराली नितीन यांना 226 गुण घेतले दहाव्या स्थानावर भोसले अमर तुकाराम व दराडे आरुष कुमार यांना 224 गुण, अकराव्या स्थानावर पाटील दूर्वा जीवन व जगताप शांभवी संदीप यांना 222 गुण घेतले.
या घवघवीत यथाबद्दल आदर्श आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील, सरचिटणीस प्रेमाताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील, प्रशासकीय अधिकारी साहेबराव देशमुख, प्राचार्य नंदकुमार नन्नवरे, उप मुख्याध्यापक प्रमोद कदम तसेच पर्यवेक्षक कुमार निकम, राजेंद्र जाधव, बी बी. गुंड, शेषनाथ वाघ, बालाजी गोरे, शरद क्षीरसागर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे,पालकांचे व संबंधित स्कॉलरशिपचे विषय शिकवणाऱ्या सर्व शिक्षक, रमेश चौधरी, किरण गरड,दीपक केंगार, संध्या मुंडे, सचिन चव्हाण, रामेश्वर बोबडे, अंबादास माढे, सीताराम दिरगुळे, भोसले के एस., शिंदे, सातवी स्कॉलरशिप विभागाचे प्रमुख आर.बी.जाधव यांचे अभिनंदन केले.
