तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र नवनिर्माण सेना धाराशिव (तुळजापूर, उमरगा, लोहारा व धाराशिव ग्रामीण) जिल्हाध्यक्षपदी महेश जाधव नियुक्ती करण्यात आली असून नियुक्तीपत्र मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतेच मुंबई येथे दिले.
महेश जाधव यांनी मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष, मनसे शहराध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष म्हणून त्यांनी तालुका स्तरावर पक्ष विस्तारावर भर दिला. जिल्हाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर महेश जाधव म्हणाले, “राजसाहेबांच्या विचारांवर विश्वास ठेवून मी धाराशिव जिल्ह्यातील बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि स्थानिक विकासासाठी मनसे आक्रमकपणे उभी राहील. प्रत्येक कार्यकर्त्याला बरोबर घेऊन पक्ष वाढवणे हे माझे ध्येय आहे.“
