परंडा (प्रतिनिधी)- परंडा तालुक्यातील शासनमान्यता कृषी सेवा केंद्रातून शेतकरी वर्गाने मोठ्या प्रमाणात बी बियाणे ची खरेदी करून आपल्या शेतात पेरणी केली होती. पण बियानाची उगवण न झाल्या मुळे तालुक्यातील शेतकरी वर्गास दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे.
तेव्हा संबंधित आधिकारी यांनी या न उगवलेल्या ठिकाणाची पाहणी करून बोगस बियाणे ची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुकाध्यक्ष किरण कुमार करळे यांनी एका लेखी निवेदनाद्वारे तहसीलदार परंडा याच्या कडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले की शेतकऱ्यांना दिलेल्या बीयाण्याची तात्काळ चौकशी करून बीयाने न उगवलेल्या ठिकाणांची पाहणी करून त्याचे पंचनामे करून पुन्हा दुबार पेरणी साठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी देखील करळे यांनी केली आहे. तसेच परंडा येथील कृषी दुकानातून मागेल ती खते देण्यात येत नाहीत त्याला दुसरे खते घेण्यासाठी दुकानदार सांगत आहेत शिवाय खताची पावती देखील अधिकृत मिळत नसल्याचे ही शेतकरी सांगतात याकडे संबंधित अधिकारी यांनी लक्ष द्यावे. अशी मागणी करळे यांनी केली आहे.
