धाराशिव (प्रतिनिधी)-  मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सच्या 29 व्या वर्धापन दिनानिमित्त धर्माबाद जिल्हा नांदेड येथे दिनांक 26 जुलै रविवार रोजी सकाळी दहा वाजता भव्य  मराठवाडा व्यापार परिषदेचे आयोजन केसरी मलजी करवा  प्रेक्षागृह, राजाराम काकांनी सहकार विद्या मंदिर येळवत रोड येथे करण्यात आले आहे. या व्यापार  परिषदेचे उद्घाटक  महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष श्री रविंद्रजी मानगावे तर अध्यक्षस्थानी मराठवाडा चेंबरचे अध्यक्ष आदेशपाल सिंग छाबडा हे असणार आहेत. परिषदेचे प्रमुख मार्गदर्शक गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या अध्यक्षा सौ राजश्रीताई हेमंत  पाटील तर श्री सुनील किर्दक उपाध्यक्ष महाराष्ट्र चेंबर व श्री राहुलजी हिंगमिरे प्रख्यात सुप्रीम कोर्ट विधिज्ञ  यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. मराठवाडा नेहमीच आवर्षणग्रस्त असल्यामुळे  या भागातील व्यापारी वर्गाच्या समस्या राज्यातील इतर भागातील  व्यापारी वर्गापेक्षा  वेगळ्या आहेत. त्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र चेंबर व मराठवाडा चेंबर च्या माध्यमातून काय करता येईल या विषयावर या परिषदेत चर्चा होणार आहे. सरकार महानगरपालिकेच्या माध्यमातून पुढील काळात आस्थापना   कर लावण्याच्या तयारीत आहे तसेच महावितरणने लावलेले ग्रिड सपोर्टिंग चार्ज, व्यवसाय कर मार्केट कमिटीचे विविध प्रश्न, जीएसटी मध्ये असलेल्या किचकट अटी तसेच व्यापारी बांधवांना पेन्शन मिळण्या  संबंधी तसेच इतर विषयावरही सरकारचे लक्ष गंभीरतेने वेधण्याचा या परिषदेच्या माध्यमातून होणार आहे. या परिषदेस महाराष्ट्र चेंबरचे माजी अध्यक्ष मानसिंह  पवार,  उपाध्यक्ष सत्यनारायणा लाहोटी, तनसुखजी झांबड, प्रफुलजी मलानी व मराठवाडा चेंबरचे माजी अध्यक्ष कल्याणजी  बर कसे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. ही परिषद यशस्वी होण्यासाठी नांदेड  अडतीया असोसिएशनचे अध्यक्ष  सुबोध काकांनी व त्यांची टीम परिश्रम घेत आहे. या परिषदेत व्यापार व सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट व कौतुकास्पद कार्य करणाऱ्या व्यापाऱ्यांचा ही स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.  या परिषदेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त  व्यापारी बांधवांनी  उपस्थित राहून व्यापारी वर्गाची एकजूट सरकारला दाखवावी असे आव्हान मराठवाडा चेंबरचे महासचिव श्याम लोया, जालना व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विनीत सहानी, महासचिव संजयजी दाड, राजेश  राऊत, इंदरसेट  तवरावाला, कोषाध्यक्ष विजय राठी, कार्याध्यक्ष सुभाष देविदान, अर्जुन गेही, बंकटलाल खंडेलवाल, दिलीप भाई शहा  व्यापारी महासंघाच्या इतर पदाधिकाऱ्यांनी केली आहे आहे.


 
Top