धाराशिव (प्रतिनिधी)- आषाढी वारी पालखी सोहळा 2026 च्या पार्श्वभूमीवर श्री गजानन महाराज पालखी, श्रीमत संत एकनाथ महाराज पालखी, श्री क्षेत्र मुक्ताईनगर पालखी आणि श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थान, कोंडण्यापूर (जि.अमरावती-विदर्भ) पालखी या पालख्या जिल्ह्यातून विविध मार्गांनी मार्गस्थ होणार आहेत.या पालख्यांच्या मार्गक्रमणासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक नियोजन केले असून, पालख्यांचे आगमन, विसावा व मुक्कामाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. मात्र,आवश्यकतेनुसार या वेळापत्रकात बदल होऊ शकतो,असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
श्री गजानन महाराज यांची पालखी 12 जुलै रोजी कळंब शहर आगमन व रात्री मुक्काम. 13 जुलै रोजी गोविंदपूर येथे विसावा व तेरणा साखर कारखाना येथे मुक्काम. 14 जुलै रोजी किणी येथे विसावा व उपळा येथे मुक्काम. 15 जुलै रोजी धाराशिव शहरात आगमन, संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर येथे विसावा व लेडीज क्लब येथे मुक्काम. 16 जुलै रोजी वडगाव (सि.) येथे विसावा व तुळजापूर येथे मुक्काम. 17 जुलै रोजी सांगवी येथे विसावा घेऊन सोलापूर जिल्ह्याकडे प्रस्थान. तसेच श्रीमत संत एकनाथ महाराज यांची पालखी 16 जुलै रोजी अंतरवली येथे विसावा, तित्रज येथे विसावा व दांडेगाव येथे मुक्काम. 17 जुलै रोजी देवगाव येथे विसावा, खंडेश्वरी येथे विसावा,रत्नापूर येथे विसावा व आनाळा येथे मुक्काम. 18 जुलै रोजी कंडारी येथे विसावा, पाचपिंपळे येथे विसावा, पिंपरखेड येथे विसावा व परंडा येथे मुक्काम.19 जुलै रोजी परंडा येथे विसावा.
श्री क्षेत्र मुक्ताईनगर यांची पालखी 15 जुलै रोजी पारगाव येथे मुक्काम. 16 जुलै रोजी येसवंडी येथे विसावा व वाकवड येथे मुक्काम.17 जुलै रोजी भूम येथे विसावा व भूम येथेच मुक्काम. 18 जुलै रोजी आष्टा येथे विसावा, जवळा येथे मुक्काम व त्यानंतर सोलापूर जिल्ह्याकडे प्रस्थान. तर श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थान, कोंडण्यापूर (विदर्भ) यांची पालखी 14 जुलै रोजी कळंब शहरात आगमन व मुक्काम. 15 जुलै रोजी कन्हेरवाडी (ता.कळंब) येथे मुक्काम.16 जुलै रोजी सकाळी पानगाव येथे विसावा, दुपारी येरमाळा येथे विसावा, त्यानंतर उमरी फाटा येथे विसावा घेऊन सोलापूर जिल्ह्याकडे प्रस्थान करणार आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध मार्गांवर मोठ्या संख्येने वारकरी सहभागी होणार असल्याने संबंधित यंत्रणांनी आवश्यक सुविधा,वाहतूक नियोजन,सुरक्षा व्यवस्था आणि मूलभूत सोयींची तयारी केली आहे.तसेच पालखी मार्गावरील नागरिकांनी आणि वाहनचालकांनी प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.