धाराशिव (प्रतिनिधी)- काँग्रेस पार्टी जिल्हा धाराशिव यांच्या वतीने विशेष सखोल पुनर्निरीक्षण (SIR) मोहीम प्रभावीपणे राबविण्याच्या उद्देशाने धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघातील BLA-2 प्रतिनिधींसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. रविवारी काँग्रेस भवन, धाराशिव येथे झालेल्या या शिबिराला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या प्रशिक्षण शिबिरासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस डॉ. रेखाताई चव्हाण यांनी प्रमुख प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन केले. त्यांनी BLA-2 प्रतिनिधींना विशेष सखोल पुनर्निरीक्षण (SIR) मोहिमेचे महत्त्व, मतदार पडताळणीची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, नवीन मतदार नोंदणी, चुकीच्या नोंदी दुरुस्त करणे तसेच प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत पोहोचून त्याचा घटनात्मक मतदानाचा अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी करावयाच्या कामाची सविस्तर माहिती दिली.

यावेळी मार्गदर्शन करताना वक्त्यांनी सांगितले की, लोकशाहीची खरी ताकद प्रत्येक नागरिकाच्या मतदानाच्या अधिकारात आहे. कोणताही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये, कोणाच्याही मतदानाच्या अधिकारावर गदा येऊ नये आणि संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष व विश्वासार्ह व्हावी, यासाठी प्रत्येक BLA-2 प्रतिनिधीने जबाबदारीने आणि सातत्याने काम करणे आवश्यक आहे.

प्रत्येक BLA-2 प्रतिनिधीने आपल्या कार्यक्षेत्रातील गावोगावी व घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी करावी, नव्या पात्र मतदारांची नोंदणी करावी, चुकीच्या नोंदी दुरुस्त करून प्रत्येक नागरिकाचा मतदानाचा अधिकार सुरक्षित ठेवावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. काँग्रेस पक्षाने ही मोहीम संघटित आणि प्रभावीपणे राबवून यशस्वी करावी, असा निर्धारही या शिबिरात व्यक्त करण्यात आला.

प्रशिक्षण शिबिरात धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघातील BLA-2 प्रतिनिधी, काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिरात मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहिमेच्या विविध बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच आगामी काळात ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या.

यावेळी काँग्रेसचे धाराशिव जिल्हा अध्यक्ष उमेश राजे निंबाळकर,ज्येष्ठ नेते विश्वास शिंदे, राजेंद्र शेरखाने,माजी जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, शहराध्यक्ष युवक अध्यक्ष गणेश पवार  धनंजय राऊत, विनोद वीर, ॲड.सिराज मोगल,आप्पा शेळके,अझर पठाण,विजय मुद्दे,खलील सय्यद,अग्निवेश शिंदे,महेबुब पटेल,अशोक शेळके,दिलीप गारगुंड,प्रदीप सस्ते ,हरिभाऊ शेळके ,शहाजी मुंडे,भैया निरफळ ,रोहित कसबे,संजय गजधने,हरिदास शिंदे ,अशोक बनसोडे,अभिमान पेठे,भागवत पेठे ,किशोर राऊत ,बालाजी हुबाले ,बाबा मोमीन,प्रेमानंद सपकाळ,समीर कोरबू,संकेत पडवळ मिलिंद गोवर्धन,प्रभाकर लोंढे,ज्योती सपाटे,जालिंदर केंद्रे ,अप्पा निमसे ,संकेत पडवळ,मिलिंद गोवर्धन काझी जावेद अभिमान पेठे अशोक बनसोडे,भैय्या निरपळ, सरफराज काझी, अभिषेक बागल, मोइज सय्यद, पोपट शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने BLA प्रशिक्षणार्थी व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top