तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील विविध गावांमधील रास्ता भाव (स्वस्त धान्य) दुकानांच्या नव्या परवान्यासाठी तहसील प्रशासनाने जाहीर प्रगटन प्रसिद्ध केले असून, पात्र उमेदवारांकडून 31 जुलैपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. संबंधित जाहीर प्रगटनाची प्रत तहसील कार्यालयासह ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि नगरपरिषद कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

यामध्ये अग्रवाल (तुळजापूर), मोटे (तुळजापूर), खुंटेवाडी, टेलर नगर, मसला खुर्द, सिंदफळ (कोतवाल), कदमवाडी आणि जळकोटवाडी (तुळजापूर) या आठ ठिकाणांच्या रास्ता भाव दुकानांचा समावेश आहे. तहसील प्रशासनाने संबंधित ग्राम महसूल अधिकाऱ्यांना जाहीर प्रगटनाची व्यापक प्रसिद्धी करण्याच्या सूचना दिल्या असून, ग्रामपंचायतीच्या अधिकृत व्हॉट्सॲप गटांसह विविध माध्यमांतून ही माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पात्र उमेदवारांनी 31 जुलैपूर्वी विहित नमुन्यात अर्ज तहसील कार्यालय, तुळजापूर येथे सादर करावेत, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. त्यामुळे इच्छुक व पात्र उमेदवारांनी मुदतीपूर्वी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दाखल करावेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

 
Top