तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर येथे रविवार, दि. 12 जुलै 2026 रोजी श्री क्षेत्र उमरखेड, जि. यवतमाळ येथील श्री चिन्मय मूर्ती संस्थानचे मठाधिपती परमपूज्य माधवानंद गुरुवामनानंद स्वामी महाराज यांच्या शुभहस्ते श्री तुळजाभवानी मातेस विधिवत अभिषेक, पूजाअर्चा व ओटी भरण्यात आली. याप्रसंगी श्री चिन्मय मूर्ती संस्थानचे कुलमुखत्यार ॲड. महेश कनकदंडे व मोहिनीताई कनकदंडे यांनी भक्तिभावाने श्री तुळजाभवानी मातेस 281 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अर्पण केले.
या पवित्र प्रसंगी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने परमपूज्य स्वामी महाराज यांच्या दर्शनासाठी डोलीची विशेष व्यवस्था करण्यात आली. दर्शनानंतर संस्थानच्या वतीने स्वामी महाराजांचा तसेच ॲड. महेश कनकदंडे व मोहिनीताई कनकदंडे यांचा श्री देवीजींची प्रतिमा व महावस्त्र देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
