धाराशिव (प्रतिनिधी)-  रुपामाता नॅचरल शुगर यु. क्र. 01, पाडोळी (आ.), ता. जि. धाराशिव येथे गाळप हंगाम 202627 निमित्त आयोजित मिल रोलर पूजन समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. समारंभाची विधिवत पूजा रुपामाता परिवाराचे मार्गदर्शक तथा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर गुंड (गुरुजी) आणि हभप. बाबुराव पुजारी यांच्या शुभहस्ते पार पडली. विधिवत पूजा करून गाळप हंगाम 2026-27 च्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. 

रुपामाता उद्योग समूहाचे संस्थापक तथा भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य  ॲड.व्यंकट गुंड आणि कार्यकारी संचालक ॲड.अजित गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योग समूह सातत्याने प्रगतीपथावर वाटचाल करत आहे.

यावेळी बोलताना सुधाकर गुंड (गुरुजी) यांनी सांगितले की, कारखान्याची प्रतिदिन 800 टनांनी ऊस गाळप क्षमता वाढवून आता 2800 टन प्रतिदिन करण्यात आली आहे.  याप्रसंगी जनरल मॅनेजर एम. जी. राठोड, चीफ इंजिनिअर अविनाश समुद्रे, डेप्युटी चीफ इंजिनिअर संजय गुंड, चीफ केमिस्ट दिगंबर आवताडे, सुरक्षा अधिकारी लोकरे, रुपामाता परिवारातील हर्षल मोहिते व अनिकेत नवले यांच्यासह विभाग प्रमुख, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, कामगार, ऊस उत्पादक शेतकरी,वाहतूक ठेकेदार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  सूत्रसंचालन गजानन पाटील यांनी केले.

 
Top