धाराशिव (प्रतिनिधी)- खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रवेशानंतर शिवसेनेनी धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना कार्यकारणी शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने बरखास्त करण्यात आली आहे खासदार ओमराजे निंबाळकर व माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांच्या सल्ल्याने नवीन कार्यकारणी होणार असल्याचे समजते.
गेल्या काही दिवसापासून धाराशिव जिल्ह्यातील शिवसेनेत मोठे वाद होते जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी व निवडणुकीनंतर सत्ता स्थापन करता वेळी भारतीय जनता पार्टीची सलगी असणारा गट व तानाजी सावंत यांचा गट असा वाद शिवसेनेत पाहायला मिळाला. त्यात जिल्हाप्रमुख पदी सुरज साळुंखे यांना डावलून अजित पिंगळे यांना जिल्हाप्रमुख पद देण्यात आले. याच कालावधीत अजित पिंगळे यांनी भारतीय जनता पार्टी यांच्याबरोबर सलगी करत धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना ही भारतीय जनता पार्टीच्या दावणीला बांधली असा आरोप अनेक वेळा शिवसेनेतील कार्यकर्त्यांनी केला होता. एवढेच नाही तर अजित पिंगळे यांची हकालपट्टी करा अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक व आमदार तानाजी सावंत यांच्याकडे केली होती. यावर आता नुकताच कालच खासदार ओमराजे निंबाळकर यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश झाला. या प्रवेशावळी आमदार तानाजी सावंत हे देखील तिथेच उपस्थित होते. प्रवेशाला काही तास होताना होतात तोच धाराशिव जिल्ह्यातील संपूर्ण शिवसेना कार्यकारणी बरखास्त करण्याचे पत्र निघाले असून, यात शिवसेना सचिवांच्या नावाने हे पत्र निघाले आहे. यात शिवसेना, युवासेना, महिला आघाडी या सगळ्याच कार्यकारिणी बरखास्तकरण्याचा निर्णय घेतला आहे. यात प्रामुख्याने अजित पिंगळे यांचे जिल्हाप्रमुख पद व त्यांच्या कार्यकर्त्यांचा तालुकाप्रमुख पद गेला असल्याने हा अजित पिंगळे व भारतीय जनता पार्टीशी संलग्न राहणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्यांना खासदार ओमराजे यांच्या प्रवेशानंतर एकनाथ शिंदे व तानाजी सावंत यांनी मोठा दणका दिल्याचे बोलले जात आहे.