भूम (प्रतिनिधी)-  या प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस  डॉ. रेखा ताई चव्हाण यांनी मतदार पडताळणीची संपूर्ण प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, नवीन मतदार नोंदणी, चुकीच्या नोंदी दुरुस्त करणे आणि प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत पोहोचून त्याचा मतदानाचा घटनात्मक अधिकार सुरक्षित ठेवण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

काँग्रेस पक्षासाठी मतदार यादी हा केवळ निवडणुकीचा दस्तऐवज नसून लोकशाहीवरील जनतेच्या विश्वासाचा पाया आहे. त्यामुळे कोणताही पात्र मतदार वंचित राहू नये, कोणाच्याही मतदानाच्या अधिकारावर गदा येऊ नये आणि संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व निष्पक्ष व्हावी, यासाठी प्रत्येक बीएलए -2 प्रतिनिधीने जबाबदारीने आणि सातत्याने काम करण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर, भूम तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. सिराज मोगल परंडा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. हनुमंत वाघमोडे, वाशी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमर तागडे,परांडा काँग्रेस शहराध्यक्ष रमेश परदेशी युवक काँग्रेसचे मोईज सय्यद शेखापूरकर, समयोदिन काजी अभिषेक बागल भीमराव देशमुख शामराव पाटील सूर्यवंशी , संभाराजे कदम, शिवराज पाटील बाळासाहेब देशमुख अण्णा महानवर, दत्ता तांबे रवींद्र सोनवणे  दिलीप क्षीरसागर, रवींद्र सोनवणे बीएलओ-01 यांच्यासह बीएलए -2 प्रतिनिधी, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.

 
Top