धाराशिव (प्रतिनिधी)-  कै. रुपाबाई यांच्या प्रेरणेने गुंड परिवाराने धर्म, समाज आणि राष्ट्रकार्यात दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करत अयोध्येच्या कारसेवेत कै. रुपाबाई व गुंड परिवाराने आदर्श घालून दिला असे कै. रुपाबाई विश्वनाथराव गुंड यांच्या 23 व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कीर्तनात हभप. पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी सांगितले. 'आई' या विषयावर अत्यंत हृदयस्पर्शी निरूपण करत कै. रुपाबाई यांनी आपल्या कुटुंबावर केलेल्या संस्कारांचे विशेष स्मरण हभप पाटील यांनी केले. 

कीर्तनात बोलताना महाराज म्हणाले, “आई ही केवळ जन्म देणारी नसते, तर ती संस्कारांची पहिली शाळा असते. आईच्या विचारांवरच कुटुंबाची दिशा ठरते. ज्या आईने आपल्या मुलांमध्ये धर्मनिष्ठा, राष्ट्रभक्ती, समाजसेवा आणि त्यागाची भावना रुजवली, त्या आईचे जीवन खऱ्या अर्थाने धन्य असते.“ यावेळी त्यांनी 1992 साली अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी आंदोलनातील ऐतिहासिक कारसेवेचा उल्लेख करत सांगितले की, “कै. रुपाबाई विश्वनाथराव गुंड यांनी स्वतः अयोध्येच्या कारसेवेत सहभागी होत धर्म आणि राष्ट्रकार्यासाठी आपले योगदान दिले. त्यांच्या या कृतीतूनच त्यांनी आपल्या कुटुंबात राष्ट्रभक्ती, धर्मनिष्ठा आणि त्यागाचे संस्कार रुजवले. 

या कार्यक्रमास सुधाकर गुंड गुरुजी, ॲड. व्यंकट गुंड, रुपामाता परिवारातील सर्व प्रमुख व सदस्य, धाराशिव जनता सहकारी बँकेचे चेअरमन वसंतराव नागदे, व्यंकट मरणगे, ॲड.पांडुरंग लोमटे महाराज, डॉ. किरण झरकर, बालाजी महाराज सुर्यवंशी एकंबीकर, बाबुराव पुजारी, उत्तम महाराज बोचरे, हभप.काकासाहेब महाराज एकंबीकर, ब्रम्हानंद महाराज एकंबीकर, मारुती महाराज बोचरे, सामाजिक कार्यकर्ते व्यंकट गुंड तसेच परिसरातील वारकरी संप्रदायातील मंडळी आणि पंचक्रोशीतील हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.महिलांची संख्या लक्षणीय होती.


 
Top