उमरगा (प्रतिनिधी)- ज्ञानज्योती फाऊंडेशन उमरगा यांच्या वतीने मागील 16 वर्षांपासून प्रतिवर्षी उमरगा व लोहारा तालुक्यातील इयत्ता 10 वी व 12 वी च्या परीक्षेतील यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, करीअर मार्गदर्शन मेळावा तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना ज्ञानज्योती पुरस्कार वितरण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
यंदा हा 17 वा कार्यक्रम 28 जुन 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता शांताई मंगल कार्यालय, उमरगा येथे आयोजित करण्यात आला असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार प्रा.रविंद्र गायकवाड, डॉ.विजयकुमार फड, खासदार डॉ.ज्योती वाघमारे, माजी आमदार शिवसेना उपनेते ज्ञानराज चौगुले, जितेंद्र शिंदे, जिल्हा परिषद उपाध्यक्षा उषाताई गायकवाड, सभापती आकांशा चौगुले, अश्लेष मोरे, अभय चालुक्य, नगराध्यक्ष किरण गायकवाड, लोहारा पं.स. सभापती पल्लवी जानकर, उपसभापती अमोल पाटील, लोहारा नगराध्यक्षा वैशाली खराडे, गटशिक्षणधिकारी उमरगा अमोल राजपुत, गटशिक्षणाधिकारी लोहारा शिवकुमार बिराजदार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
ज्ञानज्योती फाऊंडेशन, उमरगा यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या ज्ञानज्योती पुरस्कार 2026 चे मानकरी सुनील माने, ॲड. प्रवीणचंद्र तोतला, शेखर घंटे, , रसिका कटकधोंड, गिरीष भगत, संतोष शिंदे असुन त्यांना मान्यवरांच्या हस्ते सदर कार्यक्रमात पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.