धाराशिव (प्रतिनिधी)- पोलीस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांचे मार्गदर्शनखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार असे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह अवैध धंद्यांविषयी माहिती काढून कारवाई करण्यासाठी गस्त घालत असताना धाराशिव शहरातील नाझ हॉटेलच्या पाठीमागे जुगार अड्डा चालू असल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने धाड टाकून 3 लाख 34 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, स्थानिक गुन्हा शाखेचे पथक धाराशिव शहरातील शिवाजी चौक येथे आले असता पथकास गोपनीय माहिती मिळाली की, पाथ्रुड चौक, नाझ हॉटेलचे समोरील वडारवाडा कमानीचे आतमध्ये विजय मुद्दे यांचे घरासमोर काही इसम जुगार खेळत आहेत. यावर पथकाने नमूद ठिकाणी छापा टाकला असता तेथे अकलाक शेख, प्रभाकर साळुंखे, बाबु ठाकर राठोड, करण वाघमारे, प्रशांत स्वामी, शाहेद शेख, शेखर शिंदे, समद शेख, राजु मुद्दे, सागर बाकले, विजय मुद्दे, हे सर्व लोक तिरट मटका जुगार खेळत असताना जुगार साहित्यासह रोख रक्कम व 3 मोटरसायकल, मोबाईल 8 असा एकुण 3 लाख 34 हजार 20 रूपयांचा माल बाळगलेले असताना पथकास आढळले. यावर पथकाने जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अंतर्गत धाराशिव शहर पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षकरितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि अमोल मोरे, शौकत पठाण, धयानंद गादेकर, बहीराम शिंदे, दत्तात्रय राठोड, जावेद काझी, प्रकाश औताडे, ाशोभा बांगर, पुष्कर मुंगळे, सुभाष चौरे, शेरखाने यांचे पथकाने केली आहे.
