धाराशिव (प्रतिनिधी)- छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य शेतकरी मोर्चाच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे लोकनायक आमदार रोहित पवार हे गुरुवार, दि. 25 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) जिल्हा कार्यालय, सुकर्मा कॅपिटल, जिजाऊ चौक, बार्शी नाका, धाराशिव येथे उपस्थित राहून पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
या बैठकीत शेतकरी मोर्चाच्या नियोजनाबाबत तसेच संघटनात्मक विषयांवर चर्चा होणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, विविध सेलचे जिल्हाध्यक्ष, महिला आघाडी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, विद्यार्थी आघाडी तसेच पक्षाच्या सर्व विभागांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बैठकीस आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) धाराशिव जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी केले आहे.