तुळजापूर (प्रतिनिधी)- छत्रपती संभाजीनगर येथील श्री तुळजाभवानी देवींच्या निस्सीम भक्त मालती खानापूरकर यांनी आज श्री तुळजाभवानी देवींच्या चरणी एक लाख रुपयांची देणगी अर्पण केली.

मालती खानापूरकर या आपला मुलगा व मुलीसह आज सकाळी श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांनी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानकडे एक लाख रुपयांची देणगी सुपूर्द केली. मंदिर संस्थानच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. उपेंद्र तामोरे यांनी मालती खानापूरकर व त्यांच्या कुटुंबीयांचा श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा आणि महावस्त्र भेट देऊन यथोचित सन्मान केला. या प्रसंगी मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.

 
Top