धाराशिव (प्रतिनिधी)- उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक विधान परिषद निवडणुकीसाठी तिन्ही जिल्ह्यात मिळून 99.34 टक्के मतदान झाले आहे. लातूर जिल्ह्यात 5 जणांनी मतदान केले नाही. मतदान सर्वत्र शांतेत झाले असून, महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील व महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांनी आपल्या विजयाचे दावे केले आहेत. या निवडणुकीचे निरीक्षक मिलिंद बोरीकर यांनी धाराशिव व लातूर जिल्ह्यातील काही मतदान केंद्रांना भेटी दिल्या. 

उस्मानाबाद-लातूर- बीड या तिन्ही जिल्ह्यात मिळून 29 मतदान केंद्र होते. त्यापैकी 28 मतदान केंद्रावर 100 टक्के मतदान झाले आहे. तर लातूर जिल्ह्यातील एका मतदान केंद्रावर 99.34 टक्के मतदान झाले आहे. तर तिन्ही जिल्ह्यातील मिळून एकूण 988 मतदार आहेत. 99.34 टक्के तिन्ही जिल्ह्यात मतदान झाले आहे. लातूर जिल्ह्यात मात्र पाच मतदारांनी मतदानात सहभाग नोंदविला नाही. यामध्ये दोन महिला व तीन पुरूष मतदारांचा समावेश आहे. मतदानानंतर उस्मानाबाद-लातूर-बीड मतदान केंद्रावरील मतपेट्या धाराशिव येथील भाई उध्दवराव पाटील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात कडेकोट बंदोबस्तात रात्री उशिरा आणण्यात आल्या आहेत. 22 जून रोजी याच ठिकाणी मतमोजणी होणार आहे. 

 
Top