तुळजापूर (प्रतिनिधी)-  पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील भाविक येणभर सचिन कालूराम यांनी श्री तुळजाभवानी मातेस 49.420 ग्रॅम वजनाचा सुवर्ण हार अर्पण करून आपली श्रद्धा व्यक्त केली.

येणभार हे सहकुटुंब श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापूर येथे आले असता त्यांनी मंदिर संस्थानकडे विधिवत सुवर्ण हार सुपूर्द केला. मंदिर संस्थानच्या नोंदीनुसार हा हार स्वीकारण्यात आला. यावेळी मंदिर संस्थानच्या वतीने येणभार यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. या प्रसंगी मंदिर संस्थानचे अधिकारी व कर्मचारी तसेच पुजारी बांधव उपस्थित होते.

 
Top