धाराशिव (प्रतिनिधी)- युवा नेतृत्व मल्हार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.

या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी मेघ पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व प्रथम केक कापून मल्हार दादा पाटील यांना अभिष्टचिंतन करण्यात आले. यावेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने म्हणाले की, आज वाढदिवसाचे निमित्त आहे म्हणून आम्ही वृक्षारोपण करत आहोत. परंतु मल्हार पाटील यांचा व्यापक दृष्टिकोन असून नेहमीच ते वृक्ष संवर्धनासाठी आग्रही असतात. त्यांच्या माध्यमातून युवा पिढीला एक सक्षम नेतृत्व मिळाले असून त्यांच्या हातून उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना आपण करत आहोत.

 या वाढदिवसाचे खास आकर्षण म्हणून मेघ पाटील यांची उपस्थिती होती.  मेघ पाटील यांनी वृक्ष संवर्धनाचे महत्त्व सांगून उपस्थित सर्वांना या वृक्षांचे संवर्धन आणि जतन करणे या विषयी माहिती दिली. या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी महाविद्यालयाचे सर्व विभाग प्रमुख,प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.

 
Top