धाराशिव (प्रतिनिधी)- सामाजिक, सांस्कृतिक तसेच विविध क्षेत्रांतील विधायक उपक्रमांना चालना देण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या विलासराव देशमुख सेंटरच्या धाराशिव जिल्हा शाखेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम रविवारी (दि. 21 जून) सायंकाळी 5.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

धाराशिव शहरातील परिमल मंगल कार्यालय येथे होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्राचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार तथा उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष उल्हासदादा पवार राहणार आहेत. यावेळी दैनिक लोकमत, पुणे आवृत्तीचे संपादक संजय आवटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यात सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि जनहिताच्या विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या व्यक्ती व संस्थांना एकत्र आणून विधायक उपक्रम राबविण्याचा मानस सेंटरच्या जिल्हा शाखेने व्यक्त केला आहे. या उद्घाटन सोहळ्यास जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजन समितीच्या प्रशांत पाटील, रविंद्र केसकर, अग्निवेश शिंदे, ॲड राज कुलकर्णी, प्रा. सोमनाथ लांडगे, सुधीर सस्ते, प्रा. रवी निंबाळकर, प्रा. अजित शिंदे, ॲड अनिकेत देशमुख, डॉ. सायम रझवी, डॉ. सुधीर शिंदे, सुनील बडूरकर, शशिकांत वैराळे यांनी केले आहे.

 
Top