धाराशिव : शहरातील शिवशंभूपंढरी वसाहतीत रिलायन्स ऑफिस समता नगर येथे छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. प्रथम श्रीपतराव भोसले हायस्कूलचे प्राचार्य नंदकुमार नन्नवरे , जिल्हा संस्कार भारती संरक्षक अनील ढगे, संभाजी बागल यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक प्रतिमा पुजन करण्यात आले . मनोगतात नन्नवरे यांनी शिवराज्याभिषेक दिनाचे महत्व विशेद करण्यात आले. या प्रसंगी श्रीपतराव भोसले हायस्कूल कलाध्यापक शिवाजी भोसले , पोलिस कर्मचारी एकनाथ कुंडकर , संस्कार भारती प्रांत दृश्य कला संयोजक कलाध्यापक शेषनाथ वाघ , पेंटर राजू वाघमारे , भीमराव वाघमारे , दिलीप कांबळे , कार्यक्रम यशस्वीतेसाठी कु. सार्थकी वाघ , अर्णव दहिटणकर , अनघ दहिटणकर, प्रणव गादेकर , प्रतिक गादेकर यांनी परिश्रम घेतले .