धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. अनिरुद्ध वनकर प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग यांच्या प्रमुख उपस्थितीत धाराशिव येथे काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणी, आगामी कार्यक्रम व जनसंपर्क अभियानासंदर्भात जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
प्रदेशाध्यक्ष डॉ.अनिरुद्ध वनकर बोलताना म्हणाले की, मी माझ्या पदाचा अजून पदभार स्वीकारलेला नाही. पदभार स्वीकारण्याच्या अगोदर मी पूर्ण महाराष्ट्र दौरा करणार आहे. आणि या दौऱ्यामध्ये आज धाराशिव जिल्ह्यामध्ये मी आलो आहे. राज्यभरात जिल्हा, गाव, वार्ड, प्रभाग गावागावात काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या माध्यमातून गावोगावी पोहोचवू.
संपूर्ण देशावर बीजेपी च्या माध्यमातून आरएसएसची सत्ता आहे. या आरएसएसला कडवा विरोध करण्याचे काम अनुसूचित जाती विभाग करीत आहे. देशाचा विकास बाजूला राहिला पण हे आताचे सरकार शहराची, गावाची नावे बदलत आहेत,तुम्ही जातीय द्वेषातून गावाची शहराची नावे बदलत आहात पण आमची आडनावे कशी बदलणार. त्यांनी पुढे बोलताना भीमा कोरेगाव लढ्याचा उल्लेख आपल्या भाषणात आवर्जून केला. जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर यांना पक्ष वाढीसाठी व येणाऱ्या आगामी 2029 चा निवडणुकीमध्ये ताकद वाढण्यासाठी आपण आजपासून कामाला लागावे असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी काँग्रेस कमिटीचे राजेंद्र शेरखाने, प्रशांत पाटील, खलील सय्यद, हरीभाऊ शेळके, शिवाजी गायकवाड,अग्निवेश शिंदे,धनंजय राऊत,प्रभाकर लोंढे,ऍड.कांबळे,हरिभाऊ शेळके,शहाजी मुंडे तसेच धाराशिव शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
