तुळजापूर (प्रतिनिधी)-  तुळजापूर येथील वादग्रस्त उपविभागीय पोलीस अधिकारी  डॉ. निलेश विश्वासराव देशमुख यांची सहाय्यक पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड या पदावर नियुक्ती झाली असून त्यांच्या जागेवर, पालघर येथे कार्यरत असलेले मनोहर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तुळजापूर शहरात देशमुख यांच्या विरोधात साळखी उपोषणाचे आंदोलन केले होते. तुळजापूर हे राज्याचे कुलदैवत श्री तुळजाभवानी मंदिर, वाढती भाविकांची गर्दी, कायदा-सुव्यवस्थेची आव्हाने, अवैध धंद्यांवरील नियंत्रण आणि वाहतूक व्यवस्थापन यामुळे कायमच संवेदनशील ठरले आहे. ड्रग्स, गावठी कट्टे, अवैध धंदे देशमुख यांच्या काळात राज्यभर गाजले होते. या पार्श्वभूमीवर नव्याने नियुक्त झालेले मनोहर पाटील यांच्यासमोर अनेक महत्त्वाची आव्हाने असणार आहेत. कार्यकाळ संपल्यानंतरही देशमुख बरेच महिने तुळजापुरात ठाण मांडून होते. त्यांच्यावर राजकीय वरदहस्त असल्याने त्यांच्या बदलीबाबत अनेक तर्कवितर्क काढले जात होते. 

डॉ. देशमुख यांच्या कार्यकाळात विविध पोलीस कारवाया, प्रशासकीय निर्णय आणि स्थानिक पातळीवरील घडामोडी चर्चेचा विषय ठरत होत्या. आता त्यांच्या बदलीनंतर नव्या अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीकडे भाविक नागरिक, व्यापारी, यांचे लक्ष लागले आहे.


 
Top