तुळजापूर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील भिकार सारोळा येथील जगदे कुटुंब गेली तीनशे वर्षापासून मोहर्रम (डोले) हा सण साजरा करून राष्ट्रीय एकतेचे दर्शन घडवित आहे. सध्या जगदे कुटुंबातील चौथ्या पिढीनेही ही परंपरा कायम ठेवली आहे.

भिकार सारोळा गावामध्ये मोहरम सण कोणीच साजरा करत नसल्याने गावातील माधव जगदे प्रत्येक वर्षी मोहरम सणाला आवर्जून बाहेर गावी जायचे. यातूनच त्यांची मोहर्रम सणावर श्रद्धा बसली.  मोहरम सणात चंद्राची कोर असलेली नाल (नालसाहेब) मिळाले. तेव्हापासून ते आजतागायत गावातच मोहर्रमचा सण  मोठ्या उत्साहात साजरा करू लागले.

मोहरम सन दोन दिवस  साजरा करण्यात येतो. यानिमित्त 25 जून रोजी रात्री गावात सवारी मिरवणूक काढण्यात आली. 26 जून रोजी दिवसभर धार्मिक कार्यक्रम व रात्री 7 ते 10 पर्यंत संपूर्ण गावात सवारी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आण्णा जगदे , बापू जगदे,सुधाकर जगदे, जनक जगदे, बापू कोळी ,गणेश जगदे, अच्युत मोरे, गणेश तनमोर, बंडू माने, विजय मेदने, आण्णा माने, पप्पू माने, गणेश मोरे  योगेश जगदे, ओम कोळी , संतोष कोळी,पांडुरंग विश्वासे, सचिन जगदे, मैनुद्दीन शेख,मेहेबुब शेख, अमीन शेख,  भैय्या तनमोर, मजनू शेख, अहमद शेख, नागनाथ मेदने,  दशरथ मेदने, अभिषेक पाटील यांच्यासह  उत्सव पार पाडण्यासाठी गावातील हिंदू-मुस्लिम बांधव  यांनी परिश्रम घेतले.

 
Top