परंडा (प्रतिनिधी)- लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणविणाऱ्या पत्रकारांना खासदार संजय दिना पाटील यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत धमकावणे अत्यंत निंदनीय असून त्यांचा तीव्र निषेध माजी आमदार सुजितसिंह यांनी व्यक्त केला.

संसदीय लोकशाहीच्या सभागृहात प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदाराचे पत्रकारांबद्दल अर्वाच्य भाषा वापरून धमकाविणे हे कृत्य महाराष्ट्राच्या संस्कृतीला अशोभनीय आणि निंदनीय आहे.  पत्रकारांनी त्यांना तसेच दररोज ‌‘ॲान कॅमेरा' अन्‌‍ ‌‘अनकट' ‌‘शिवराळ' भाषा वापरून पत्रकार परिषद घेणाऱ्यांनाही आणि अशा सर्वच लोकप्रतिनिधींना प्रोत्साहन देण्याऐवजी पत्रकारांनी कायमचे बहिष्कृत केले पाहिजे. पत्रकारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून धमकाविणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. 

 
Top