तुळजापूर (प्रतिनिधी)-  तालुक्यातील आजी-माजी पदाधिकारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बैठक रविवार दिनांक 21 रोजी  संपन्न झाली. सदरील बैठकीमध्ये असे ठरले की ओमराजे यांनी यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातच एकनिष्ठ व कडवट राहावे आम्ही तुमच्या सोबत आहोत. आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जर पक्ष सोडला तर तुळजापूर तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सर्व आजी माजी पदाधिकारी शिवसेना महिला आघाडी, शिवसेना उप तालुका प्रमुख, विभाग प्रमुख,  शाखाप्रमुख,  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाशी एकनिष्ठ व मातोश्री सोबत राहणारच असे आज बैठकीमध्ये एकमताने ठरले आहे.

सदरील बैठकीस जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र कानडे, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख शामलताई पवार, ललिता ताई सावंत, शोभाताई शिंदे, ऋषिकेशजी मगर, कमलाकर चव्हाण, श्याम पवार, तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी, उप तालुकाप्रमुख प्रदीप मगर, सुनील जाधव, संजय भोसले,  विभाग प्रमुख महेंद्र सुरवसे, बालाजी पांचाळ, सोमनाथ घोडके, पांडुरंग लोंढे, श्याम कनकदर, अनिल छत्रे, धुळाप्पा रक्षे, रोहित चव्हाण इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top